Imtiaz Jaleel : संभाजीनगरातील इम्तियाज जलील यांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, थेट 50 जणांवर…
छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, ज्यात काँग्रेस उमेदवारांचा समावेश आहे. नागपूरमध्ये योगेश काळे यांच्यावर हल्ला झाला असून, फडणवीसांच्या सभांचे आयोजन आहे. भिवंडीत महिला सभेत राडा झाला, तर नाशिकमध्ये मनपा निवडणुकीसाठी गिरीश महाजन सक्रिय झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर त्यांच्याच पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आगामी निवडणुकांसाठी तिकीट वाटपातून डावलण्यात आल्याने नाराज कार्यकर्त्यांनी ही कृती केली. जलील यांची प्रचार रॅली बायजीपुरा भागातून जात असताना अचानक काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी घेरली असल्याचे काल पाहायला मिळाले. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार हबीब कुरेशी आणि कलीम कुरेशी यांचा समावेश आहे. या घटनेनंतर बायजीपुरा भागात असदुद्दीन ओवेसी यांची पायी रॅली निघणार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
फडणवीस मुंबईकर नाहीत... ठाकरे बंधूंनी घेरले अन् थेट केला हल्लाबोल
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार? शेवटच्या मुलाखतीत ठाकरेबंधू BJPवर बरसले
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला

