Sambhajinagar : धक्कादायक…महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, वैजापूर हादरलं; घडलं काय?
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली असून भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर मधील वैजापुरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वैजापुरमध्ये एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर वैजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकार हभप संगीताताई महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असताना जमिनीचा वाद किंवा चोरीच्या उद्देशाने हत्याचा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जमिनीच्या वादावरून यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर जमिनीच्या वादाच्या दिशेनेही पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

