Sambhajinagar : उद्योजक लड्डा दरोडा प्रकरण; मुख्य आरोपीचा थरारक पद्धतीने एन्काउंटर
Sambhajinagar Crime News : संभाजीनगर येथील दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून मध्यरात्री थरारक प्रकारे एन्काउंटर करण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक लड्डाच्या घरावरील दरोडा प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या दरोडा प्रकरणातील आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केलेल्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर झाला आहे. दरोड्यातील काही आरोपींना पोलिसांचं सहकार्य असल्याचा आरोप शिरसाट यांनी काहीदिवसांपूर्वी केला होता.
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी 14 मे रोजी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात 4 किलो सोनं आणि 20 किलो चांदी दरोडेखोरांनी लांपास केलेली होती. पोलिसांकडून 15 तारखेला सकाळपासून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. सुरुवातीला पोलिसांनी वॉचमन असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. तब्बल 10 दिवस या प्रकरणात एकही आरोपीला अटक झालेली नव्हती. 11 दिवसांनंतर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली. मात्र मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री सर्च ऑपरेशन राबवलं. यावेळी अमोलकडून पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. गाडी घालून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी अमोल याच्यावर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अमोल खोतकर हा जागीच ठार झाला. दरम्यान, अमोल खोतकरकडे या दरोड्याचा संपूर्ण मुद्देमाल असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून हा मुद्देमाल ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज

