लातूरमधील विलासराव देशमुखांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रवींद्र चव्हाण संभाजीनगरच्या सभेत स्पष्टच बोलले..
काँग्रेस हा पक्ष विलासराव देशमुख यांच्या नावाचा वापर करून तिथे मतं मागतंय त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालेलं काम, मी ह्यावर बोललो. विलासराव देशमुख हे खूप मोठे नेते होते, मी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका टिपण्णी केली नाही.
संपूर्ण राज्यभरात महानगरपालिका निवडणुकींसाठी प्रत्येक पक्षाकडून प्रचार सभा जोरदार पणे सुरू होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या भाजपचे नेते रवींद्र चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवारांच्या उपस्थीतीत रवींद्र चव्हाणांनी जाहीर सभा घेतली. सभेत विकास कामांवर बातचीत केली. त्याच बरोबर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सामान्य व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे असं आव्हान चव्हाणांनी कार्यकर्त्यांना जाहीर सभेत केलयं.
लातूर मध्ये झालेल्या सभेत रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांवर वक्तव्य केलं होत. त्यावर छत्रपती संभाजीनगरच्या सभेत चव्हाण स्पष्टच बोलले. त्यावर रवींद्र चव्हाण म्हणतात, मी लातूरमध्ये नागरी सुविधा कोणती पार्टी गतिमान पध्दतीने करून देईल यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुका असतात, त्यामुळे लातूरमध्ये सुध्दा सर्व सुविधा गतिमान पद्धतीने व्हायला हव्यात, मात्र काँग्रेस हा पक्ष विलासराव देशमुख यांच्या नावाचा वापर करून तिथे मतं मागतंय त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालेलं काम, मी ह्यावर बोललो. विलासराव देशमुख हे खूप मोठे नेते होते, मी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका टिपण्णी केली नाही.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका

