‘विरोधक अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे सारा देश पाहतोय’; मुख्यमंत्री शिंदे यांची विरोधी पक्षांवर टीकास्त्र
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून वाद होताना समोर येत आहेत. याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी, देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय.
मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । केंद्र सरकारवर विरोधकांनी अविश्वास ठराव आणला असून त्यावर जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून वाद होताना समोर येत आहेत. याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी, देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत. ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक

