उद्धव ठाकरे यांच्या ‘बोगसपणा’वरून एकनाथ शिंदे यांचा पटलवार; म्हणाले, जे अडीच वर्ष घरी बसले…
शासन आपल्यादारी या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर टीका करत हा कार्यक्रम बोगसपणा असल्याचे म्हटले होते.
बीड, ५ डिसेंबर २०२३ : बीडमध्ये आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर टीका करत हा कार्यक्रम बोगसपणा असल्याचे म्हटले होते. याच टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, जे अडीच वर्ष घरी बसले त्यांना काय कळणार शासन दारीचं महत्त्व? त्यांना काय कळणार शेतकऱ्यांच्या वेदना? ज्यांनी अडीच वर्ष घरात बसून बोगसगिरी केली. त्यांनी कार्यक्रमाला बोगस म्हणावं हा कार्यक्रमाला आलेल्या लोकांचा अपमान आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. हा सामान्यांचा कार्यक्रम आहे. सामान्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आहे. हे सरकार आपलं आहे. आपल्या योजनांची अंमलबजावणी काटेकोर झाली पाहिजे त्यासाठी आपला आटापिटा आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय करावं ते सूचत नाही. मोठ्या संख्येने लोक कार्यक्रमाला येत आहेत त्यामुळे ही त्यांची पोटदुखी असल्याचे शिंदे म्हणाले.