त्या बोलतात ते आक्षेपाहार्य नाहीये का? भाजपच्या नेत्याचा अंधारे यांच्यावर टीका
निलेश राणे यांनी, त्या माझ्या पेक्षा तीन वर्षांनी लहान आहेत. पण त्या आम्हाला ज्या काही नावाने हाक मारतात, आमच्या मोठ्या नेत्यांना कशा नावाने हाक मारतात त्या आक्षेपाहार्य नाहीये का? असा सवाल उपस्थित केला आहे.
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात सध्या वाद सुरू आहे. यावादारून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना, शिरसाट यांनी काय टीका केली हे माहित नाही. पण अंधारे ताई भान ठेवून बोलतात का याचाही कधी तपास झाला पाहिजे असे म्हटलं आहे.
निलेश राणे यांनी, त्या माझ्या पेक्षा तीन वर्षांनी लहान आहेत. पण त्या आम्हाला ज्या काही नावाने हाक मारतात, आमच्या मोठ्या नेत्यांना कशा नावाने हाक मारतात त्या आक्षेपाहार्य नाहीये का? असं म्हटलं आहे. मोठमोठ्या नेत्यांबद्दल त्यांच्या भाषणांमध्ये जो काही उल्लेख होतो, जी उदाहरण त्या देतात ते काय बरोबर नाही. पण त्या कुठल्या पातळीच्या टीका करतात? कोणावर करतात? आपण कोण आहोत? समोरचा कोण आहे? याचं भान ठेवून बोलतात का? याचाही कधी तपास झाला पाहिजे असेही निलेश राणे असा सवाल उपस्थित केला आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

