मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधानांची भेट घेणार; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी दीड वाजता ही भेट होणार आहे.
नवी दिल्ली : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी दीड वाजता ही भेट होणार आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व असणार आहे. या भेटीमध्ये वेदांता प्रकल्पावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या भेटीबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेले अडीच वर्ष केंद्राशी योग्य समन्वय नसल्याने अनेक विकास कामांना ब्रेक लागला. मात्र राज्यातील जे विकास कामे केंद्रीय स्थरावर प्रलंबित आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा होणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याच्या विकासासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी देखील मुख्यमंत्री शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.
Published on: Sep 22, 2022 09:25 AM
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट

