AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट

मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट

| Updated on: Oct 11, 2026 | 10:26 AM
Share

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी २३ तासांच्या ताब्यातून अखेर सोडले आहे. काल सकाळी विमानतळावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. कॅन्ट पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर तिघांची सुटका झाली. यानंतर सीजेपीच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्ली आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेले सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची अखेर २३ तासांनंतर दिल्ली पोलिसांनी सुटका केली आहे. तिन्ही नेत्यांना काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कॅन्ट पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते, जिथून आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.

गेल्या २३ तासांपासून हे तिन्ही नेते पोलिसांच्या ताब्यात होते. या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. अभिजीत दीपके, सौरव दास आणि रांका यांच्या सुटकेने सीजेपी कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. या अटकेमुळे पुढील आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली होती, मिळालेल्या माहितीनुसार सुटकेवेळी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे त्यांना महराष्ट्रात येण्याची परवानगी असू शकते, अशा चर्चा आहेत.  मात्र आता नेत्यांच्या सुटकेमुळे सीजेपीची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Oct 11, 2026 10:16 AM

Follow Us