AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...

CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले…

| Updated on: Oct 10, 2026 | 12:26 PM
Share

CJP आंदोलनादरम्यान संस्थापक अभिजीत दीपके, ध्रुव राठी यांच्यासह अनेकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली विमानतळावरून दीपके यांना विमानातूनच अटक करण्यात आली. भाजपने या आंदोलनामागे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचे हात असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या CJP आंदोलनाशी संबंधित प्रमुख व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावर विमानातून उतरताच ताब्यात घेण्यात आले. महिला पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ताब्यात घेण्यात येत असताना दीपके यांनी आपण अटक होण्यासाठीच आल्याचे पोलिसांना सांगितले.

यापूर्वी CJP च्या लीगल टीमच्या प्रमुख रत्ना सिंह यांनाही अटक करण्यात आली होती. तसेच प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यांनाही गुरुग्राम पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. या सर्व अटकेमुळे CJP आंदोलनाभोवती नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. भाजप नेते नितीन नवीन यांनी या आंदोलनामागे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडी’ आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांचे समर्थक CJP गट असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही गटांकडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नवीन यांनी केला आहे. जनतेने नाकारलेल्या या शक्तींचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असेही ते म्हणाले.

Published on: Oct 10, 2026 12:26 PM

Follow Us