Fadnavis vs Thackeray : उद्धवजी 2029 पर्यंत स्कोप नाही, त्यामुळे… शिंदेंसमोरच फडणवीसांची ठाकरेंना खुली ऑफर अन्…
अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली आणि शिंदेंच्या समोर फडणवीसांनी आता 2029 पर्यंत तुम्हाला स्कोप नाही त्यामुळे तुम्हीच आमच्याकडे या असं म्हणत खुली ऑफरच देऊन टाकली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ काल पार पडला. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निरोप देण्याचा समारंभ होता. या निमित्ताने यावेळी टोलेबाजी आणि जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले. दानवेंना शुभेच्छा देताना आता २०२९ पर्यंत उद्धव जी तुम्हाला कोणताही स्कोप नाही. हवं तर तुम्हीच आमच्याकडे या…अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफरच दिली आहे. तर विधान परिषदेत पुन्हा येईन यावरूनही जोरदार टोलेबाजी रंगली. पुन्हा या… म्हणत फडणवीसांनी अंबादास दानवे यांना शुभेच्छा दिल्या. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना डिवचण्याची संधी सोडली नाही. अंबादास दानवे यांचा प्रवास कसा भाजप पासून सुरु झाला हे फडणवीसांनी सांगितलं पण त्याच वेळी दानवे ज्या शिवसेनेत आहेत त्या शिवसेनेत आता बदल झालेत असेही फडणवीस म्हणाले त्यावरूनही जोरदार जुगलबंदी रंगली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

