'शपथविधीला राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरेंना स्वतः निमंत्रण दिलं पण...', अनुपस्थितीवर फडणवीस काय म्हणाले?

‘शपथविधीला राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरेंना स्वतः निमंत्रण दिलं पण…’, अनुपस्थितीवर फडणवीस काय म्हणाले?

| Updated on: Dec 06, 2024 | 3:57 PM

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते.

नुकताच मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य महायुती सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि राज ठाकरे हे उपस्थित नव्हते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘महायुतीच्या शपथविधीच्या निमित्ताने शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि राज ठाकरे या सगळ्या नेत्यांना मी स्वतः फोन केला’, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इतकंच नाहीतर शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि राज ठाकरे यांना फोनवरून महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, ज्यांना फोन केले त्यातल्या प्रत्येकांने अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात. काही व्यक्तीगत कारणांमुळे ते लोकं येऊ शकले नाहीत पण त्यांनी त्यांच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Published on: Dec 06, 2024 03:57 PM