“काहीजण कंत्राटदारांची भाषा बोलायला लागले”, मुख्यमंत्री शिंदे यांचा आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला
चांदीवली येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर टीका केली आहे.
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे पिता-पुत्र यांनी कंबर कसली आहे. एकीकडे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे मुंबईमध्ये बैठका घेत आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे मुंबईत सभा घेत आहेत. मुंबई महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आणि ठाकरे यांचा पराभव करण्यासाठई शिंदे पिता-पुत्र सज्ज झाले आहेत. चांदीवली येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि विरोधकांवर टीका केली आहे. “एवढी कामं होत असल्यामुळे काहींची पोटदु:खी वाढत आहे. काहीजण कंत्राटदारांची भाषा बोलायला लागले आहेत”, असा अप्रत्यक्ष टोला एकनाथ शिंदे यांनी अदित्य ठाकरे यांना लगावला आहे. “बाळासाहेब ठाकरेच्या नावाने चार दवाखाने तयार केलेले आहेत. पोटदुखी होतेय त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या दवाखानात जावं”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा

