जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संपावर; शिंदे-फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आता जोर धरत आहे. जिल्हा परिषद,निम सरकारी, महसूल, राज्य सरकारी, महानगरपालिका यासह शासनातील सुमारे 32 विभागाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. पाहा...
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आता जोर धरत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. जिल्हा परिषद,निम सरकारी, महसूल, राज्य सरकारी, महानगरपालिका यासह शासनातील सुमारे 32 विभागाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील 68 हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान जुन्या पेन्शन योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार आहे. 2005 नंतरच्यांना जुनी पेन्शन लागू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published on: Mar 13, 2023 08:32 AM
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

