मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा अयोध्या दौरा करतोय, मला ‘या’ गोष्टीचा आनंद-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde Ayodhya Daura : अयोध्येला येण्याची मला ही संधी प्राप्त झाली. लखनौपासून अयोध्येपर्यंत भगवमंय वातावरण आहे. प्रसन्न वाटतंय, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. पाहा व्हीडिओ...
लखनौ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात रावणराज्य आलंय याला आज उत्तर देणार आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. बाळासाहेब ठाकरेंचा जो कार्यकर्ता चांगला काम करायचा, त्याच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. जो धाडस करायचा, जो कार्यकर्ता स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवायचा, असे कार्यकर्ते बाळासाहेबांना आवडायचे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राम मंदिर हा बाळासाहेबांच्या फार जिव्हळ्याचा विषय होता. मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिर उभं राहतंय. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिला अयोध्या दौरा करत आहे. याचा आनंद आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

