“आमची मैत्री म्हणजे फेव्हिकॉलचा जोड”, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका

“आमची मैत्री म्हणजे फेव्हिकॉलचा जोड”, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका

apeksha sakpal | Updated on: Jun 15, 2023 | 4:48 PM

एकनाथ शिंदे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीवरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यातलं राजकारण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखाद्या जाहिरातीमुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.

पालघर : एकनाथ शिंदे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीवरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यातलं राजकारण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखाद्या जाहिरातीमुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. पुढे ते म्हणाले की, “माझी आणि फडणवीस यांची 15-20 वर्षांपासूनची दोस्ती आहे. हे सरकार अतिशय मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं.आमदार असल्यापासून आमचं बाँडिंग आहे. ही युती खुर्चीसाठी झालेली नाही. “

Published on: Jun 15, 2023 4:48 PM
Follow Us