मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी, ‘त्या’ मराठ्यांनाच मिळणार कुणबी प्रमाणपत्र, मुख्यमंत्री काय म्हणाले?
VIDEO | जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस असताना त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात आहे. अशातच आज काय तोडगा निघणार का? याकडे लक्ष लागलेलं असताना मराठा आरक्षाणसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार
मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस असताना त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात आहे. अशातच आज काय तोडगा निघणार का? याकडे लक्ष लागलेलं असताना मराठा आरक्षाणसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे समितीच्या अहवालावरून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या निर्णयावरून उद्यापासून कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ उपमितीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळ उपसमितीची मंत्रालयात बैठक झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला आहे.

