येत्या काळात कोणतं ध्येय गाठायचंय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात सांगितलं…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या काळातील आपला निर्धार बोलून दाखवला. tv9 मराठीच्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' 2023 कार्यक्रामत ते बोलत होते. पाहा...
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या काळातील आपला निर्धार बोलून दाखवला. tv9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ 2023 कार्यक्रामत ते बोलत होते. “आमचं सरकार सत्तेत येऊन सहा-सात महिने झालेत. सहा-सात महिने हा कार्यकाळ फार कमी आहे. परंतू या कमी काळातदेखील आम्ही काय काम केलं ते आपल्यासमोर आहे. प्रामुख्याने इन्फ्रा प्रोजेक्ट राज्यामध्ये सुरू केले आहेत. बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आम्ही नागपूर ते शिर्डी सुरु केला. शिवाय उद्योग फ्रेंडली वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. भविष्यात राज्यात चांगले प्रकल्प यावेत यासाठी प्रयत्नशील आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Published on: Feb 13, 2023 12:08 PM
Latest Videos
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

