बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिंदे गट अन् ठाकरे गटात राडा, मुख्यमंत्री म्हणाले, बाटग्यांना ‘तो’ अधिकारच नाही
एकनाथ शिंदे यांनी काल बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले यावेळी बाटग्या उबाठा गटाने घोषणाबाजी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. स्मृतिस्थळाचे पावित्र्य लक्षात न घेता या बाटग्यांनी बाळासाहेबांचे विचार तर सोडले त्यामुळे बाटग्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे शिंदे म्हणाले.
मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ : दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर त्यांच्यात राडादेखील झाला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी बाटग्या उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. ते एवढ्यावरच थांबलेच नाही तर त्यांनी स्मृतीस्थळावर घुसण्याचा प्रयत्न केला आणि तेथील रोलिंगही तोडले. स्मृतिस्थळाचे पावित्र्य लक्षात न घेता या बाटग्यांनी बाळासाहेबांचे विचार तर सोडले आणि आजपर्यंत केवळ त्याला तिलांजली देण्याचे काम केले. त्यामुळे या बाटग्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नावही घेण्याचा अधिकार नसल्याचे शिंदे म्हणाले.
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...

