AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी मुख्यमंत्री झालो, हा 'यांचा' आशीर्वाद!

मी मुख्यमंत्री झालो, हा ‘यांचा’ आशीर्वाद!

| Updated on: Sep 28, 2022 | 10:21 AM
Share

मी मुख्यमंत्री झालो, यामागे कुणाचा आशीर्वाद आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सांगितलं.

चंदन पूजाधिकारी, नाशिकः शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला हादरवून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. याला राजकीय दृष्ट्या कुणाचं पाठबळ आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी आज या सर्व घडामोडींमागे स्वामी नारायणजींचा आशीर्वाद असल्याचं म्हटलं आहे. नाशिकमध्ये स्वामी नारायण मंदिराच्या (Swami Narayan Temple) उद्घटन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘ 11- 11- 2017 मध्ये मी आलो होतो. शीलान्यास भूमीपूजन झालं होतं. उद्घाटन समारोहात मला इथं येण्याची परवानगी मिळाली आहे. मी मुख्यमंत्री झालो, हा स्वामी नारायणजींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मी सर्व लोकांना धन्यवाद देऊ इच्छितो.

Published on: Sep 28, 2022 10:21 AM