‘तर गळफास घेऊन मरेन…’; शिंदेंचे आमदार शहाजीबापूं पाटलांचं चॅलेंज, यंदा जिंकू किंवा मरूची भूमिका
सांगोल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जिंकू किंवा मरू या पद्धतीचं चॅलेंज स्विकारून ठाकरेंच्या शिवसेनेला एक प्रकारे आव्हानच दिलं आहे. सांगोल्यामध्ये यंदा विधानसभा निवडणुकीत तिरंग लढतीची शक्यता असताना पराभूत झालो तर गळफास घेईल असं आव्हानच शहाजीबापू पाटलांनी दिलंय.
जर यंदा विजयाचा गुलाल उधळला नाही तर गळफास घेईन, असं आव्हान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्विकारलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आव्हान देताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. आतापर्यंत निवडणुकीत पैशांची पैज लागत असताना शहाजी बापू पाटील यांनी थेट जिवाची बाजी लावण्याचं चॅलेंज स्विकारलंय. संजय राऊत म्हणजे सकाळी ९ वाजता महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी १ नाही तर १० सभा घेऊ देत.. मी त्याला पालथा तुडवून पुढे जाऊन दाखवेन, मी विजयाचा गुलाल उधळला नाही तर फास घेऊन मरेन, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटल्यानंतर मतदारसंघात आता चर्चा सुरू झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या रंजक समीकरणांनी शहाजीबापू पाटील हे विजयी झालेत. सांगोल्यात अनेक दशकं शेकापंचे गणपतराव देशमुख आमदार राहिलेत त्यांच्या निधनानंतर त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली. त्यात शहाजीबापू पाटलांचा निसटता विजय झाला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

