Kamal Khan Video : ‘कमाल’चा खोटापीडिया… छत्रपती संभाजीराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
छत्रपती संभाजीराजांबद्दल विकिपीडियावरचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडून देण्यात आलेल्या आहेत. या मजकुरावरून काय वाद झाला आणि विकिपीडिया वारंवार अशा मजकुरांमुळे वादामध्ये का सापडतंय?
इतिहासाबद्दल राहुल सोलापूरकर नंतर आता अभिनेता कमाल खानने अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजीराजांबद्दल विकिपीडियात असलेला आक्षेपार्ह मजकूर खरा असल्याचा दावा करत त्याने एक पोस्ट शेअर केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. यावर संताप व्यक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सायबर विभागाला विकिपीडियावरील हा मजकूर हटवण्याबाबत पाऊलं उचलण्याचे आदेश दिले आहेत.
कोण आहे कमाल खान?
कमाल खान हा एक भोजपुरी अभिनेता आहे. याआधी आपली विधाने आणि पोस्टमुळे त्याला अनेकदा अटकही झाली आहे. आधी विधान करायची आणि नंतर माफी मागाची हा कमाल खानचा जुना नित्यक्रम राहिला आहे. फक्त आक्षेपार्ह विधानच नाही तर इतरही अनेक गुन्ह्यांमध्ये कमाल खान तुरुंगाची हवा खाऊन आला आहे.
ज्या विकिपीडियावरच्या माहितीवरून हा वाद सुरू झाला आहे ते विकिपीडिया म्हणजे काय?
इंटरनेटच्या उदयाआधी एखादी माहिती मिळवण्यासाठी पुस्तकांचाच आधार घ्यावा लागायचा. मात्र इंटरनेट नंतर विकिपीडिया नावाचं एक माहिती केंद्र उदयाला आलं. इथे जगभरातले लाखो लोक आपल्याकडची माहिती शेअर करतात ती माहिती वारंवार अपडेट देखील होत असते. एखाद्याने टाकलेली माहिती खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी काही लोकांचा समूह देखील आहे. याआधी अनेकदा विकिपीडियावरच्या माहितीच्या अचूकतेवर वादही झाले आहेत. विकिपीडियाचा मुख्य कारभार अमेरिकेतून चालतो.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
