CM Fadnavis : खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा भरला मंत्र्यांना सज्जड दम, बघा काय म्हणाले?
बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही असा सज्जड दम फडणवीसांनी दिलेला आहे. दरम्यान बेशिस्त वर्तन केल्यास खपवून घेतला जाणार नाही कारवाई होणार.. तर कोकाटें विरोधात रोष होता म्हणून खाते बदललं असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
माणिकराव कोकाटेंचं विधानभवनात रमी खेळण्याचं प्रकरण खाते बदलावर निभावलं. माणिकराव कोकाटे यांकडे क्रीडा खातं असणार आहे तर दत्ता भरणेंकडे कृषी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान यावेळी फडणवीसांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलाय. बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही, आता थेट कारवाई करू अशा शब्दात फडणवीसांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलाय. दरम्यान, कोकाटेंना क्रीडा खातं दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी चांगलाच टोला लगावलाय. रमी खेळाला आंतरराष्ट्रीय मान्यता द्या, असा खोचक टोला सपकाळ यांनी लगावलाय. तर कोकाटेंचं मंत्री पद बदलल्यानंतर आता मंत्रिमंडळात दुसऱ्या बदलांची चर्चा होणार नसल्याचं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
कृषी खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढून घेतल्यानंतर माणिकराव कोकाटेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार असल्याचे म्हटलंय.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

