Ladki Bahin Yojana : निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा ‘लाडक्या बहिणीं’साठी सरकारचा मोठा निर्णय, पैसे परत घेणार?
सरकसकट नियम आणि निकषांचा विचार न करता निकष धुडकावून अपात्र ठरणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. यानंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यातून दंडासह योजनेची रक्कम परत घेतली जाणार?
गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली. निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. अशातच महायुती सरकार पुन्हा राज्यात आल्यास लाभार्थी महिलांना १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले त्यामुळे २१०० रूपये कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे या योजनेचा सरकसकट नियम आणि निकषांचा विचार न करता निकष धुडकावून अपात्र ठरणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. यानंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यातून दंडासह योजनेची रक्कम परत घेतली जाणार? अर्जांची छाननी, पडताळणी सुरू असताना जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार का? असे सवाल असताना दरम्यान या योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मात्र अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याची मोठी माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिली.
Published on: Jan 22, 2025 03:50 PM
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
