Breaking | उद्धव ठाकरेंचा फोन, मोदींचा लगोलग रिप्लाय; राऊतांच्या ‘रोखठोक’मधून इनसाईड स्टोरी
शनिवारी दिवसभरात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना थेट फोन लावला. मोदी लगेच फोनवर आले. राज्यातील खुशाली विचारली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) होते. मोदींची महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन झाल्यावर ठाकरे-मोदी यांची वैयक्तिक अर्धा तास चर्चा झाली. याच चर्चेवरुन महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होईल काय? मोदी ठाकरे यांच्यामध्ये काय बोलणं झालं? पुढे काय होईल? अशा चर्चा रंगलेल्या आहेत. मोदी-ठाकरे भेटीविषयीचा तपशील आजच्या सामना रोखठोकमधून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याशी आपला उत्तम संवाद आहे, चिंता नसावी. शनिवारी दिवसभरात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना थेट फोन लावला. मोदी लगेच फोनवर आले. राज्यातील खुशाली विचारली. ”मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात भेटायचे आहे.” उद्धव ठाकरे पुढे गमतीने म्हणाले, ”अब मेरे साथ दो और साथी है, उनको भी साथ लाना है.” यावर पंतप्रधानांनी लगेच वेळ देतो असे सांगितले व पंतप्रधान कार्यालयाने बुधवारची वेळ नक्की केली. कोणाच्याही मध्यस्थीशिवाय मोदी-ठाकरे भेट झाली हे महत्त्वाचे.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

