CM Inaugurates E-Bus | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण

| Updated on: Aug 07, 2021 | 1:13 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण पार पडलं. यावेळी बेस्टच्या वर्धापन दिनी सर्व वाहक-चालक, बेस्ट कर्मचारी यांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल धन्यवाद देतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो... असं मुख्यमंत्री म्हणाले.

Follow us on

CM Uddhav thackeray Inaugurates Mumbai E-Bus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण पार पडलं. यावेळी बेस्टच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सर्व वाहक-चालक, बेस्ट कर्मचारी यांना त्यांच्या अविरत सेवेबद्दल धन्यवाद देतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो… कोरोनाच्या काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली व कुठेही अडचण येऊ दिली नाही…जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली.  कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कारोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले पण तरीदेखील बेस्ट थांबली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.