AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोपर रेल्वे पुलाचं लोकार्पण

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोपर रेल्वे पुलाचं लोकार्पण

| Edited By: | Updated on: Sep 07, 2021 | 4:41 PM
Share

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांबाबत भाष्य केलं.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोपरी रेल्वे पुलाचा लोकार्पण अशा प्रकारचे सोहळे व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे पार पडले. यावेळी अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. त्यांनी मंदिर उघडण्याबाबतही भाष्य केलं. आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण उघडत आहोत. त्याबद्दल जनता तुम्हाला आशीर्वाद देईल.असं मुख्यमंत्री म्हणाले.

तसंच कपिलजी (केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उद्देशून) तुमच्या परिसरात आरोग्य केंद्र आहे, आज त्याचीच आवश्यकता आहे ना. की आरोग्य केंद्र बंद करून त्याच्याबाजूचं मंदिर उघडू? असा सवाल करतानाच आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरंही महत्त्वाची आहेत. मंदिरंही उघडणार आहोत. पण एका टप्प्याटप्प्याने आपण जात आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.