AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी घडामोड! उमेदवारी मागे घेताच काँग्रेसचा दणका! दोन उमेदवारांची थेट हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

| Updated on: Jun 05, 2026 | 4:37 PM
Share

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठी संघटनात्मक कारवाई करत यवतमाळ येथील उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर येथील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने या दोन्ही नेत्यांना उमेदवारी दिली होती. मात्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली.

पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाऊन उमेदवारी मागे घेतल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. त्यानुसार दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, पक्ष शिस्तीबाबत काँग्रेसने कठोर भूमिका घेतल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाकडून भविष्यात अशा प्रकारच्या शिस्तभंगाच्या घटनांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे संकेतही या निर्णयातून मिळत आहेत.

Published on: Jun 05, 2026 04:24 PM

Follow Us
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम.

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला,  4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक.

युक्रेनमध्ये जहाजावर भीषण हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू; भारत सरकार आक्रमक

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या.

लोकांचा आवाज दडपण्याऐवजी तो ऐका… दिल्लीतील लाठीचार्जवरून सुप्रिया सुळे सरकारवर संतापल्या

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!