Jairam Ramesh : परदेशात शिष्टमंडळ पाठवण्यावरून राजकारण, जयराम रमेश यांची टीका
Congress delegation controversy : दहशतवादाविरुद्ध भारताचा सुरू असलेला लढा आणि ऑपरेशन सिंदूर दाखवण्यासाठी केंद्र सरकारने ३२ प्रमुख भागीदार देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे. यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉंग्रेसने चार नावं सुचवली, पण मनमानीपणाने यादी बनवण्यात आली, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे. परदेशात शिष्टमंडळ पाठवण्यावरून ही राजकारण सुरू असल्याचं देखील जयराम रमेश यांनी म्हंटलं आहे. तसंच आम्ही कोणालाही थांबवलेलं नाही किंवा बहिष्कार देखील घातलेला नाही, असंही यावेळी त्यांनी म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, सरकारने ज्या चार नावांची नावे जोडली आहेत ते ज्येष्ठ खासदार आहेत, त्यापैकी एक माजी परराष्ट्र मंत्री देखील राहिले आहे, ते अनुभवी आहेत, त्यांना परराष्ट्र धोरणाचे चांगले ज्ञान आहे यात शंका नाही. त्यांनी त्यांच्या विवेकाचे ऐकावे. आमच्या पक्षाकडून चार नावे मागितली होती आणि आम्ही ती दिली आहेत. यावर राजकारण करणे योग्य ठरणार नाही, असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

