AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'चलेजाव... राज्यात, देशात शिवद्रोही सरकार, त्यांना घरचा रस्ता...', नाना पटोलेंचा हल्लाबोल

‘चलेजाव… राज्यात, देशात शिवद्रोही सरकार, त्यांना घरचा रस्ता…’, नाना पटोलेंचा हल्लाबोल

| Updated on: Sep 01, 2024 | 1:49 PM
Share

केवळ आठ महिन्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज राज्यभर आंदोलन झाले. मुंबईतील आंदोलनाच्या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमना करण्याचं काम सरकारने केलं. मालवणमध्ये महाराजांची प्रतिमा पडली. ती फक्त महाराजांची प्रतिमा नव्हती, ती महाराष्ट्राचा धर्म आणि राज्याचा अवमान या सरकारने केला. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आपण आंदोलन करत आहोत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणत सरकारवर हल्लाबोल केला. पुढे ते असेही म्हणाले, मोदींनी माफी मागितली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी आम्ही राजकारण करत असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या दिवशी महाराजांचा अपमान झाला, तेव्हाच राज्यातील जनतेने शिवाजी महाराजांची माफी मागितली. आम्ही शिवद्रोही सरकार चुकून निवडून दिलं, खोके सरकार निवडून दिलं याची माफी जनतेने मागितली आहे. आम्ही पुन्हा हे सरकार राज्यात येऊ देणार नाही अशी शपथ आम्ही घेतली असल्याचे ते म्हणाले. तर जे माफीवीर लोकं आहेत, मोदी असो की शिंदे असो हे केवळ निवडणुकीसाठी माफी मागत आहेत. या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. हा फुले शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवायचा आहे. आपल्याला या शिवद्रोही सरकारला चलेजावचा नारा देणार आहोत, असेही नाना पटोले यांनी म्हटले.

Published on: Sep 01, 2024 01:49 PM