Nana Patole | शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस राहील हा प्रश्न : नाना पटोले

ज्या पद्धतीने राज्यपालांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शनिवारी तयार केले आणि रविवारी विधानसभेचे अधिवेशन घेतलं, त्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे आले आहे.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 09, 2022 | 12:35 AM

नागपूर : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. हे सरकार किती दिवस राहील हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही निर्णय पेंडिंग आहे. ज्या पद्धतीने राज्यपालांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शनिवारी तयार केले आणि रविवारी विधानसभेचे अधिवेशन घेतलं, त्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे आले आहे.  न्यायव्यवस्थेपेक्षा आणि संविधानापेक्षा ईडीचे सरकार मोठं असेल तर पुढची वाटचाल आहे, जे होईल ते बघू, असे नाना पटोले म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें