Vijay Wadettiwar | OBC समाजाची पोरं भोळीबाबडी आहेत…पण आम्ही आहोत निर्णय घेण्यासाठी :वडेट्टीवार

काही जण ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन महाज्योतीला बदनाम करत आहेत. ओबीसीसाठी चांगलं काम होत असताना काही लोकांच्या पोटात दुखतंय. (Congress leader vijay wadettivar reaction on obc at press conference in nagpur)

नागपूर : महाज्योतीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणारे विद्यार्थी नॅान क्रिमीलेअर असावेत, व्हीजेएनटीच्या भटक्या लोकांची माहिती घेण्यासाठीचं काम दिल्लीतील एका संस्थेला देतोय. काही जण ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन महाज्योतीला बदनाम करत आहेत. ओबीसीसाठी चांगलं काम होत असताना काही लोकांच्या पोटात दुखतंय, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये आयेजित पत्रकार परिषदेत केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI