विजय वडेट्टीवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या ‘त्या’ आरोपांवर छगन भुजबळांची अप्रत्यक्ष कबुली, म्हणाले…
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा आजही महिलांमध्ये जोरदार सुरू आहे. राज्यातील कित्येक महिलांनी या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज भरला आणि त्यांच्या खात्यात सरकारने दोन महिन्याचे ३००० हजार रूपये पाठवले. तर आजही काही महिलांना वेळेत या योजनेचा अर्ज भरता आला नाही म्हणून सरकारने सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमुळे इतर योजनांचे पैसे 3 महिन्यांपासून बंद असल्याचे म्हणत विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केला आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केलेल्या आरोपांवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सर्व योजनांना पैसे मिळणार असल्याचे म्हणत प्राधान्य पाहून योजनांना निधीचे वाटप केले जाणार असल्याचे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिलं इतकंच नाहीतर आजच काय तर काँग्रेस काळातही दोन दोन वर्ष सरकारी योजनांचे पैसे रखडायचे असे म्हणत छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्या सरकारवरील आरोपांवर बोलताना जोरदार हल्लाबोल केला आहे. तर काँग्रेस काळातही दोन वर्ष पैसे रखडायचे तर इतर योजनांचे पैसे रखडल्याचे सांगत छगन भुजबळांनी अप्रत्यक्षपणे कबुलीच दिली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

