MP Rajeev Satav Death | काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI