Nana Patole On BJP : सरकारचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात; निलंबनानंतर नाना पटोले संतापले
Maharashtra Mansoon Assembly Session LIVE : पावसाळी अधिवेशनात आज नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आज शेतकऱ्यांचा दिवस आहे. माज आलेले जे भाजप महायुतीचे सरकार आहे. या सरकारची वास्तविकता आज समोर आली आहे, अशी आक्रमक प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. पावसाळी अधिवेशनात आज काँग्रेस नेते नाना पटोले यांचे सभापतींनी निलंबन केले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, त्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी पटोले यांनी केली होती. सभात्याग केल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सरकारचे नेते शेतकऱ्यांना भिकारी समजतात. कपडे हे घेऊन देतात. 2014 च्या आधी लोणीकर उघडाच फिरत होता. जो शेतकऱ्यांच्याबाबतीत बोलेल त्याला निलंबित करणे आणि जे अपमान करतात त्यांना सन्मानाने बसवायचे, यश टीका नाना पटोले यांनी केली आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

