शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेस फुटणार? भाजप नेते गिरीश महाजन यांनी नेमकं काय केलं मोठं वक्तव्य?
VIDEO | काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार असल्याचे गिरीश महाजन यांचे संकेत? गिरीश महाजनांचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांच्या जिव्हारी, विजय वडेट्टीवार यांनी काय दिलं प्रत्युत्तर? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ | सध्या राजकीय वर्तुळात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या सुचक वक्तव्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार? काँग्रेसला थांबवून ठेवलंय, असं गिरीश महाजन यांनी वक्तव्य करत नेमका काय संकेत दिलाय, याची सध्या जोरदार चर्चा सुरूये. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. सर्व पक्ष तर मला इथेच दिसत आहेत, जे असतील नसतील ते, कुणी सुटलेलं नाही. शिवसेना आहे, आम्हीपण आहोत, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, आता काँग्रेसपण येईल, पण काँग्रेसला सध्या थांबलेलं आहे, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केलाय. “मुंगेरीलाल के हसीन सपने, तशी गोष्ट आहे. गिरीश महाजन काय, गिरीश महाजनांच्या 20 पिढ्या आल्या तरी राज्यात काँग्रेसला फोडू शकणार नाहीत एवढं दाव्यावने मी सांगतो”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

