काँग्रेसचं आजपासून ‘हात से हात जोडो’ अभियान, यासह आज कोणत्या मोठ्या घडामोडी?
काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राज्यभरात हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ, यासह ४ मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील २४ ताज्या घडामोडी
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असताना आता काँग्रेसकडून आणखी एका नव्या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान सुरू झाले आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राज्यभरात या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. यामध्ये मोदी सरकारच्या कामाची चुकीची पद्धत लोकांपर्यंत पोहोचवला जाणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अब्रुनुकसानीच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात यासंदर्भातील याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर असणार असून सहकार विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर राज्यपाल यांचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तार आणि विकास कामांवर चर्चा करण्यासाठी आज शिंदे- फडणवीस अमित शाह यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असून युवा खासदारांना संधी देण्यात येणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून 11 मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यासह ४ मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील २४ ताज्या घडामोडी
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

