Nanded | नांदेडच्या कंधारमध्ये विकासकामांच्या शुभारंभावेळी शेकाप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

दोन्ही गटात हाणामारी जुंपल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आवरते घेतले. या प्रकाराने कंधार तालुक्यात राजकीय संघर्ष इरेला पेटल्याचे चित्र तयार झालेय. (Contro between PWP and BJP workers during the inauguration of development works in Kandhar, Nanded)

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 28, 2021 | 8:18 PM

नांदेड : विकासकामांच्या उदघाटनात खासदारांचे नाव नसल्याने नांदेडच्या कंधारमध्ये आज जोरदार राडा झालाय. लोहा कंधारचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आज काही सार्वजनिक कामांचा शुभारंभ आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमात प्रोटोकॉल नुसार खासदारांच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता आमदार शिंदे यांनी अरेरावी करत शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर आमदार समर्थकानी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत झटापट केली. दोन्ही गटात हाणामारी जुंपल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आवरते घेतले. या प्रकाराने कंधार तालुक्यात राजकीय संघर्ष इरेला पेटल्याचे चित्र तयार झालेय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें