मुंबईकरांसाठी मोठी बातमी, कोरोना रुग्णवाढीत 3 टक्कयांनी घसरण

मुंबईत कोरोना रुग्संख्येत 3 टक्क्यांनी घसरण झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईत सलग 13 दिवस मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. शनिवारी रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना रुग्संख्येत 3 टक्क्यांनी घसरण झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईत सलग 13 दिवस मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. शनिवारी रुग्णसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे. मुंबईत शुक्रवारी 20 हजार 971 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर, शनिवारी 20 हजार 318 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णावाढीचा कहर सुरु आहे. राज्यात शनिवारी नव्या 41 हजार 434 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI