Special Report | Sharad Pawar यांना Corona, देशभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. पवार यांनी स्वत: ट्वीट करत त्याबाबत माहिती दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 24, 2022 | 9:28 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. पवार यांनी स्वत: ट्वीट करत त्याबाबत माहिती दिली आहे. तसंच आपली प्रकृती चांगली असल्याचंही सांगत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु असल्याचं पवार म्हणाले आहेत. दरम्यान, पवारांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांचे नातू भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आजोबा… काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी केलंय. तर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही ट्वीट करत पवारांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

पार्थ पवार यांनी पवारांचे ट्वीट रिट्वीट करत आजोबा… काळजी घ्या. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल, असं ट्वीट पार्थ पवार यांनी केलंय. तर ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’ असं भावनिक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें