Corona Cases in India | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत 17 हजारांनी घट, कोरोनाबळींची संख्याही कमी झाल्याने दिलासा
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे (Corona Cases in India) सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 17 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 40 हजार 842 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या अडीच लाखांच्या खाली आली. कालच्या दिवसात 3 हजार 741 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोनाबळींच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा मानला जात आहे.
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
