Corona Update | शंभर टक्के लसीकरण करणारं भुवनेश्वर शहर

शंभर टक्के लसीकरण करणारं भुवनेश्वर हे देशातील पहिलं शहर बनलं आहे. भुवनेश्वरमध्ये 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत.

शंभर टक्के लसीकरण करणारं भुवनेश्वर हे देशातील पहिलं शहर बनलं आहे. भुवनेश्वरमध्ये 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत. भुनेश्वरची लोकसंख्या ही जवळपास 10 लाख इतकी आहे. देशात सध्या 46 लाख डोस दिले जात आहेत. नोटा किंवा नाण्यांवर कोरोनाचा विषाणू अनेकदिवस जिवंत राहू शकतो, अशी माहिती आता जर्मनीतील संशोधनातून समोर आली आहे. स्टीलच्या नाण्यांवर सहा दिवस तर नोटांवर तीन दिवस हा विषाणू जिवंतर राहू शकतो. मात्र, त्यावरचे विषाणू हाताला लागून कोरोना संक्रमण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग होत आहे. काही रुग्णांचे नमुना तपासल्यानंतर ही गोष्ट समोर आली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI