Special Report | ओमिक्रॉन व्हेरियंट नेमका किती धोकादायक ?

दक्षिण आफ्रिकेसह इतर देशात त्याच्यावर संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार तो डेल्टापेक्षा 6 पट जास्त बलशाली म्हणजे संसर्ग करणारा आहे. विषाणूचा हा प्रकार आपल्या प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो.

मुंबईः कोरोनाचा ओमिक्रॉन हा विषाणू डेल्टापेक्षा तब्बल 6 पट बलशाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काहीही त्रास झाला तरी चालेल. सर्व नियमांचे पालन करा. विशेषतः मास्कचा आवर्जुन वापर करा. कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉन. जगासमोरची सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरतोय. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या विषाणूची परिणामकारता, संहारकता कैक पटीने जास्त आहे. दक्षिण आफ्रिकेसह इतर देशात त्याच्यावर संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार तो डेल्टापेक्षा 6 पट जास्त बलशाली म्हणजे संसर्ग करणारा आहे. विषाणूचा हा प्रकार आपल्या प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालानुसार, हा विषाणू अति संसर्गजन्य आहे. तो लस आणि नैसर्गिक प्रतिकारशस्तीला निष्प्रभ करू शकतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI