Dr. Vasant Khalatkar | ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यत मुलांसाठी कोवॅक्सिन लस : डॉ. वसंत खळतकरांची माहिती

“ॲाक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत कोव्हॅक्सिन लस मुलांसाठी उपलब्ध होईल, लसीच्या चाचणीचा तीन महिन्यात येणाऱ्या रिपोर्ट बाबत आम्ही खुप आशावादी आहोत” अशी आशा नागपुरात लहान मुलांवर कोव्हॅक्सिन कोरोना लसीची चाचणी करणारे डॉ. वसंत खळतकर यांनी दिलीय.

राज्य सरकारने 17 ॲागस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर लहान मुलांची लस कधी येणार? हा सर्वसामान्य पालकांचा प्रश्न आहे. यावर “ॲाक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत कोव्हॅक्सिन लस मुलांसाठी उपलब्ध होईल, लसीच्या चाचणीचा तीन महिन्यात येणाऱ्या रिपोर्ट बाबत आम्ही खुप आशावादी आहोत” अशी आशा नागपुरात लहान मुलांवर कोव्हॅक्सिन कोरोना लसीची चाचणी करणारे डॉ. वसंत खळतकर यांनी दिलीय. नागपुरात 2 ते 18 वयोगटातील 525 मुलांवर झाली लसीची चाचणी, या 525 मुलांना लसीचे दोन्ही डोस दिले, मुलांमध्ये साईडइफेक्ट नाही. कोव्हॅक्सिनची ट्रायल यशस्वी झाली असून, आता अंतिम निस्कर्षाची प्रतिक्षा आहे. असंही नागपुरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. वसंत खळतकर म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI