इराणवर पुन्हा अमेरिकेचा हल्ला?; ही वादळापूर्वीची शांतता…. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे, तेलाचे दर 111 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचले आहेत. इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम जागतिक तेल बाजारावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः होर्मुज समुद्रधुनी परिसरातील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, इराणकडून संभाव्य नाकाबंदीच्या हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अमेरिका इराणवर पुन्हा कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकी माध्यमांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कठोर इशारा दिला आहे. “ही वादळापूर्वीची शांतता आहे. आता वेळ संपत चालली आहे,” असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
तसेच, “लवकरात लवकर डील करा, अन्यथा इराणमध्ये काहीही उरणार नाही,” असा इशाराही ट्रम्प यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. या वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्था, तेल बाजार आणि इंधन दरांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: May 18, 2026 09:54 AM
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी