Maharashtra weather : समुद्र खवळला, वादळी वारे… महाराष्ट्र टेन्शनमध्ये, आता राज्यभरात….
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणामामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार असून अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्राचे रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता आहे
रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका गणपतीपुळेच्या किनाऱ्याला बसल्याचे समोर आहे आहे. वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर जोरदार वादळी वारे वाहताना दिसताय. यामुळे गणपतीपुळ्यातील समुद्र खावळला असून गणपतीपुळे समुद्रकिनारी जोरदार वारे वाहू लागलेत. धोका वाढल्याने किनाऱ्यावरील पर्याटकांना पोलिसांनी बाहेर काढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळतोय. बंगालच्या उपसागरातील मेथी चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणामामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार असून अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्राचे रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता आहे.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

