Nitesh Rane Video : इतिहास शिकून घ्या… अजितदादांचा नितेश राणेंना सल्ला;. मुस्लिमांबद्दलच्या विधानावरून फटकारलं
मुस्लिमांवरून आणखी एका वक्तव्याने नितेश राणे यांनी वाद ओढवून घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती असं वक्तव्य राणे यांनी केलंय. त्यावरून अजित पवारांनी राणेंना सल्ला दिलाय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती असं वक्तव्य राणे यांनी केलंय. दरम्यान, नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर वाद सध्या वाद पेटलाय. ‘हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंगजेबाने घेतलेली त्या औरंगजेबाला थांबवण्याचा आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलं आहे. स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकलायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे’, असं नितेश राणे म्हणाले. तर नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतिहास वाचण्याचा त्यांना सल्ला दिलाय. ‘इतिहास वाचला तर लक्षात येईल शिवरायांसोबत मुस्लीम होते’, असं म्हणत अजित पवारांनी नितेश राणेंना सल्ला दिलाय. पुढे ते असेही म्हणाले, दोन्ही बाजूच्या सन्मानीय सदस्यांनी कोणत्याही वक्तव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याबाबतची काळजी घेतली पाहिजे, असंही म्हटलंय.

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
