Ajit Pawar Video : नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, ‘तुम्ही कशाचा पाठिंबा देताय, तुमच्याकडं …’
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विधानसभेत जोरदार बॅटिंग केली. विधानसभेत अजितदादांनी नाना पटोलेंच्या ऑफरवरही भाष्य केले आहे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमच्याकडे या तुम्हाला आलटून पालटून मुख्यमंत्री करतो, अशी ऑफर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच दिली होती. नाना पटोले यांनी दिलेल्या ऑफरनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत नाना पटोलेंच्या ऑफरची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले. ‘तुमच्याकडे पंधरा, वीस टाळकी अन् कशाचा पाठिंबा देताय’ असे म्हणून अजित पवारांनी नाना पटोले यांच्या ऑफरची भाष्य करत खिल्ली उडवल्याचे दिसले. पटोलेंच्या ऑफरच्या संदर्भाने बोलताना अजित पवार म्हणाले, 2024 ते 2029 ही पाच वर्षे अशी आहेत की, कोणी गंमतीने जरी म्हटलं…अमक्याने मुख्यमंत्री व्हावे, तमक्याने मुख्यमंत्री व्हावे… आम्ही पाठिंबा देतो. तुमच्याकडे माणसंच नाही तर कशाचा पाठिंबा देताय. वीस टाळकी असताना….पंधरा टाळकी असताना…दहा टाळकी असताना…असं अजित पवार म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

