अजितदादांचं होमग्राऊंडवरुन थेट आव्हान, ‘असेल धमक तर या समोर, मग बघतो ना…’
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोडे मारो आंदोलन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो असणाऱ्या बॅनरला जोडे मारले. यावरून थेट बारामतीतून अजित पवार यांनी मविआ नेत्यांना आव्हान दिलंय. पोस्टरला काय मारताय हिम्मत असेल तर समोर या...
बारामतीच्या जनसन्मान यात्रेतून अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून जोरदार पलटवार केला आहे. पोस्टरला जोडे मारता धमक असेल तर जोडे घेऊन समोर या, मग पाहतो, असे म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आव्हान दिलंय. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा होम ग्राऊंड बारामतीमध्ये पोहोचली आणि दादांचं जल्लोषात स्वागत झालं. तर अजित दादा बारामतीमध्ये येत असल्याने अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकवले. तर आतापर्यंत कोण मुख्यमंत्री झालेतर ते २०२४ मध्ये मुख्यमंत्री अजित पवारच असं छापण्यात आलं. तर निवडणुकीनंतर अजित पवारच मुख्यमंत्री असतील असे दादांचे पुत्र जय पवार यांनी सांगितलंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा

