शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ वक्तव्यावरून अजितदादांचं स्पष्टीकरण; … पण काहींना ‘ध’चा ‘मा’ करायची सवय
बारामतीतून माझ्याच पक्षाचा खासदार निवडणून द्या, असं आवाहन करताना अजित पवार जे बोलले त्यावरून शरद पवार गटातील नेत्यांचा संताप उमटलाय. काही लोक शेवटची निवडणूक आहे म्हणत असे भावनिक आवाहन करतील पण...असं वक्तव्य करताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडे बोट दाखवलं.
मुंबई, ६ फेब्रुवारी, २०२४ : वरिष्ठ नेत्यांची शेवटची निवडणूक कधी माहित नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीत बोलत असताना केलं. यावरून शरद पवार गटाचे नेते आक्रमक झालेत. तर अजित पवार यांनी ट्वीट करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे म्हटले आहे. बारामतीतून माझ्याच पक्षाचा खासदार निवडणून द्या, असं आवाहन करताना अजित पवार जे बोलले त्यावरून शरद पवार गटातील नेत्यांचा संताप उमटलाय. काही लोक शेवटची निवडणूक आहे म्हणत असे भावनिक आवाहन करतील पण शेवटची निवणूक कधी असेल माहिती नाही, असं वक्तव्य करताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडे बोट दाखवलं. तर अजित पवार या लेव्हलला जातील अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. तर जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवार यांचा समाचार घेतला. यानंतर अजित पवार यांनी स्वतः ट्विट करून माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे म्हटले आहे.
Published on: Feb 06, 2024 11:12 AM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
